Recent Updates Toggle Comment Threads | कीबोर्ड शॉर्टकट्स

  • nayanraut 3:41 pm on June 12, 2012 परमालिंक | उत्तर  

    मूर्ख पोलीस खाते 

     ACP वसंत ढोबळे आणि विश्वास नांगरे पाटील हे गेले काही महिने पोलिसांच्या समाजसेवा खात्यात कार्यरत आहेत. त्यांच्या रोजच्या धाडीमुळे बरेच बार, पब, क्लब रात्री १० – ११ नंतर बंध होतात. रेव पार्टीवर पोलिसांनी आता बरीच पकड बसवली आहे.

    विश्वास नांगरे पाटील ह्यांनी एका मुलाखतीत सांगितले कि रेव पार्टी, पब आणि क्लब मध्ये नशिल्या पदार्थांचा वापर होतो, नशा करणाऱ्या त्या युवकांना हे माहित नसते कि त्यांचा नशेच्या (ड्रगच्या) पैश्याने अतिरेकी बॉम्ब, बंदुका आणि गोळ्या विकत घेतात. किती सत्य आहे ह्या गोष्टीत आणि कोण अतिरेक्यांना पैसे देते? –

    १. अतिरेक्यांना पैसे तिकडूनच मिळतात जिकडून आपल्यालाही मिळतात. नातेवाईकांकडून. आणि त्याचे नातेवाईक तेल विकतात. त्यांच्याकडे तेल आहे आणि आपल्याकडे टाटा न्यानो. तेल कंपन्या आणि अरब देश हे अतिरेक्यांना पैसे पुरवतात हे आता आणखी सिद्ध करण्याची गरज नाही. अतिरेकी  हालचाली आणि अरब देशातील राजकीय अस्थिरता तेलाच्या किमती महाग करते आणि त्याचा फायदा तेल कंपन्यांनाच होतो.

    २. हत्यार इंडस्ट्री – खूप कमी जणांना माहित आहे कि हत्यार बनवणार्या कंपन्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच आहेत. ज्या कंपनी कडून पोलिसांना हत्यार मिळतात त्याच कंपनी कडून अतिरेक्यानाही मिळतात. चार अतिरेक्यांना आधुनिक हत्यारे देऊन मुंबई शहरात पाठवा आणि मग मुंबई पोलिसांना ४०,००० अत्याधुकीन हत्यारे विकायला काहीच अडचण नाही. मुंबई पोलिसांचे २००८ च्या अतिरेकी हल्या नंतरचे बजेट बघा आणि लगेच तुम्हाला कल्पना येईल.

    ३. राजकीय अपयश आणि शेजारचे देश – आपल्या देशातील राजकीय निपुंसकता आणि शेजारच्या देशांवर अंकुश न ठेवता येणे हे कारण नाकारून चालणार नाही.

    पोलिसांना हे समाजाने खूप जरुरी आहे कि रेव पार्टी, बार, क्लब आणि पब बंध करून अतिरेकी थांबणार नाहीत आणि ड्रग घेणारेहि थांबणार नाहीत. रात्री ११ नंतर क्लब बंध करून ड्रगचा व्यवहार थांबेल हा विचार म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. जर एखाद्या क्लब मध्ये कोणी ड्रग विकत घेत असेल तर तो रात्री ९ वाजताच विकत घेईल, मध्यरात्री पर्यंत का थांबेल?

    आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला काही वेळ स्वतःसाठी हवा असतो, काही जणांना पब मधील कर्कश आवाजात आपला त्राण, थकवा विसरायला होतो, काही जणांना क्लब मधील संगीत तर काही जणांना बार मधील ऑर्केस्ट्रा आवडतो. त्याचा ड्रग आणि नशेशी काहीच संबंध नसतो, त्यांना त्यांचा स्ट्रेस घालवायचा असतो. पोलिसांच्या समाज सेवा शाखेचा मूर्ख धोरणांमुळे आज महानगर असणारे मुंबई शहर तिसर्या जगातील शहरासारखे झाले आहे.

    पोलीसानो बंध करा हा मूर्खपणा आणि मुळातच कमी असणाऱ्या तुमचा बलाचा योग्य ठिकाणी वापर करा.

     
  • nayanraut 5:43 pm on February 29, 2012 परमालिंक | उत्तर
    Tags: बाबा, योगासन, , हास्यकथा, comedy   

    शेवटचे प्रवचन 

    श्री श्री आमदेव बाबांचं आता वय झाल होत, आयुष्यभर कठीण योगासन, प्रवचने, कीर्तने करून बाबा आता थकले होते. बाबांनी आता निवृत्तीचा निर्णय पक्का केला होता. सचिन सारख १०० व शतक वैगरे करायचे नसल्याने त्यांनी निर्णय एकदम फायनल केला. भक्तांनी बाबाचा निरोप समारंभ आयोजित केला होता, प्रमुख पाहुणे म्हणून बाबांचे परमभक्त राजकीय नेते गांधीबेटा येणार होते.

    समारंभाची तयारी एकदम जैयात होती, मंडप सजला होता, मधुर संगीत मंद आवाजात वाजत होते, प्रमुख पाहुण्यांना थोडा उशीरच झाला पण बाबा वेळेचे पक्के, बाबांनी समारंभ सुरु करण्याचा आदेशाच दिला. हार, पुष्पगुष्य आदान प्रदान झाले आणि बाबाचे शेवटचे प्रवचन चालू झाले.

    “आज माझे शेवटचे प्रवचन मी काही उपदेश देण्यासाठी वापरणार नाही, आज मी माझ अपयश सांगणार आहे. जेव्हा मी हिमालयातील त्या मठातून निघून दिल्लीला आलो, मला काही बाबा होण्याची किंवा गुरु होण्याची इच्या न्हवती. पण मग मला एक उद्देश मिळाला, आयुष्यभर मी तो उद्देश पुरा करण्यासाठी झगडलो. माझा उद्देश हा माझा पहिला शिष्य होय, माझा पहिला शिष्य माझ्यासाठी एक गूढ गणित होते आणि ते सोडवण्यात मी सगळे आयुष्य वाया घालवले. वायाच म्हणावे लागेल.” बाबांनी एक दुखी उसासा टाकला आणि संथ आवाजात पुन्हा बोलू लागले. ” त्याचे नाव मी तुम्हाला सांगू शकणार नाही पण जेव्हा तो मला पहिल्यांदा भेटला तेव्हा तो कोवळा तरुण होता. घराच्या गोष्टी विकून तो पैसे मिळवीत असे, एकदा पोलिसांनी त्याला अडवले तेव्हा त्याने जवळ जवळ त्या पोलिसाला ठारच मारले होते. त्याने नंतर अनेक वाईट गोष्टी केल्या, व्यवहारात धांदली केली, नशा, जुगार, बाई, बाटली, कसला कसला नाद त्याने सोडला नाही. मी शास्रातले सगळे उपाय केले पण काही काही परिणाम झाला नाही. हे अपयश मी आयुष्यभर झेलून आहे आणि माझ्या निवृत्तीनंतर ते मी मरेपर्यंत राहील. हे एकच दुख: मला आहे, बाकी तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रेम दिल आणि मी तुमचा आभारी आहे.”

    बाबांनी त्याचं छोटस भाषण संपवलं आणि बाकीचे समारंभ चालू राहिले, बाबाचे बरेच Hi – Profile  भक्त होते आणि त्यांनी आपापली भाषण करण्याची ईच्या पूर्ण केली. कार्यक्रम संपायला थोडासा वेळ थोता इतक्यात बाहेर घोषणा सुरु झाल्या, बाबांचे परमभक्त, राजकीय नेते, देशाच चाक असे गांधी बेटा आले होते. गांधी बेटा व्यासपीठावर काही बोलण्या अगोदरच घोषणांनी जोर धरला –

    “आज मला खूप दुख आहे कि आमदेव बाबा निवृत्त होत आहेत पण आनंद हि आहे कि बाबा आता आराम करू शकतील.” गांधी बेटा आगे बढो हम तुमारे साथ है. घोषणा चालूच, टाळ्याही चालू  ” आजही मला तो दिवस आठवतो, खूप वर्ष्यापूर्वी जेव्हा मी एक कोवळा तरुण होतो, बाबांनी मला सांगितलं होत. ते मला म्हणाले होते बेटा – आज मला माझ्या जीवनाचा उद्देश सापडला. तूच माझा पहिला शिष्य.”

    अचानक घोषणा थांबल्या,  टाळ्यांचे हात थांबले आणि बाबांच्या शेवटच्या प्रवचनात एक भयाण शांतता पसरली.

     

     
  • nayanraut 7:42 pm on January 13, 2011 परमालिंक | उत्तर
    Tags: नेते, पंतप्रधान, मनमोहनसिंग, , सामोसे   

    सहजच – विनोद 


    नेते

    आपल्या नेत्यांना देशाविषयी किती माहिती आहे ते तर सर्वांनाच माहित आहे. असाच बसल्या बसल्या त्यावर एक विनोद बनला –

    स्थळ – पंतप्रधानाचे कार्यालय

    मनमोहनसिंगांकडे काही मित्र कार्यालयात भेटायला आले होते, पंतप्रधानांनी लाल रंगाचा फोने उचलला आणि म्हणाले –
    अरे भाई जरा ३ प्लेट समोसे भेजना.

    तिकडून उत्तर आले –
    सर, मी लेफ्टनन कार्तिक बोलतोय, आणि हे भारतीय वायुदलाचे कोईम्बतूर मधील वेस्टर्न कमांड आहे. तुम्ही चुकून हॉटलाईन उचललीत सर.

    भारताच्या सर्व प्रांतावरचा चांगला अभ्यास असलेल्या आपल्या पंतप्रधानांनी लगेच उत्तर दिले –

    अच्छा अच्छा तुम्ही साउथ इंडिअन समोसे खात नाहीत ना, काम करा मग ३ प्लेट मसाला डोसे पाठउन द्या.

     
  • nayanraut 11:29 am on January 2, 2011 परमालिंक | उत्तर  

    Random Thought 

    When I was in school they teach me one important fact regarding innovations, it says “Need is mother of all innovations”. The world has changed since then and we can see that today innovation is product of imagination and creativity.

     
  • nayanraut 1:06 am on December 26, 2010 परमालिंक | उत्तर
    Tags: इसराइल, इस्रेल आर्मी, ख्रिस्ती, बेथालेहम, मोसाद, मोहमद, यहुदी, येशू ख्रिस्त, वेस्ट बँक, सौदी अरेबिया, हमास   

    येशू ख्रिस्त पुन्हा अवतरला तर? 

    इसराइलला जाऊन आल्यापासन मला पुन्हा पुन्हा हि गोष्ट लिहावीशी वाटत होती आणि नाताळचा सण हि गोष्ट लिहिण्यासाठी एक चांगला मुहूर्तच. गेल्या २ हजार वर्ष्याच्या जागतिक इतिहासात किती बदल घडला आहे, भूतकाळ आणि वर्तमानकाळापासून आपण काय शिकतोय आणि भविष्य आपल्यापुढे काय वाढून ठेवणार आहे हाच ह्या गोष्टीचा मर्म आहे.

    ख्रिस्ती धर्म हा येशू ख्रिस्त परत येणार आणि सगळ्यांना स्वर्गात घेऊन जाणार ह्या कल्पनेवर बांधला गेला आहे. काही जणांना ह्या धर्माबद्दल जास्त माहिती नसेल त्यांना येशुबद्दल थोडीशी माहिती देतो कारण आजच्या परिस्थितीत जर पुन्हा येशू अवतरला तर काय हे जाणून घेण्यासाठी थोडीशी ओळख जरुरी आहे.

    इतिहास –

    येशू हा मेरी नावाच्या एका कुमारी मातेला देवापासून झालेला मुलगा होता, त्याचा जल्म बेथालेहम मध्ये एका गोठ्यात झाला होता. वयाच्या ३० व्या वर्षी तो जेरुसलेमला आला आणि तिथे धर्म आणि मंदिराचा वाद ह्या विषयांवर आपले वेगळे विचार मांडल्याच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवून सुळावर चढवून मारले गेले.

    आज –

    बेथालेहम आज वेस्ट बँक च्या पेलेस्तेनिअन भागात आहे. तेथे हमास आणि हिज्बुल्लाच्या मुस्लीम अतिरेकीवादाच राज्य चालते. आजच्या बेथालेहममध्ये कुणी कुमारी गरोदर राहूच शकत नाही. जर अशी गरोदर मुलगी सापडली तर तिला हराम ठरवून मुस्लीम राजवट दगडांनी ठेचून मारण्याची सजा सुनावेल. २००० हजार वर्ष्यापूर्वीपेक्ष्या आजची परिस्थिती जास्तच खराब आहे आणि येशूचा जल्म तिकडे होऊच शकत नाही.

    समजा जर कुठल्या कारणाने त्या कुमारी मातेने एखाद्या बाळाला जल्म दिलाच तर तो एखाद्या गोठ्यातच (किंवा झोपडपट्टीतच )असू शकतो, आजच बेथालेहम इतक बकाल आणि गरीब आहे जिथे दवाखाने, पक्की घर आणि इतर मुलभूत सोई खूपच कमी आहेत. इसराइल आणि हमासच्या चकमकीत सामान्य नागरिक भरडले जात आहेत. २००० हजार वर्ष्यापुर्वी एका गोठ्यात जल्माला आलेला येशू ख्रिस्त आजच्या बेथालाहेममध्ये सुद्धा झोपडीतच जल्माला येवू शकतो.

    २००० वर्ष्यापुर्वी येशू ख्रिस्ताला बेथालेहम पासून जेरुसलेम पर्यंत प्रवास करताना वाटेत बऱ्याच अडचणी आल्या, ३० वर्ष तो कुठे होता हे कुणालाच माहित नाही. समजा आज एखादा मुलगा वेस्ट बँक मधून इसराइलला जायला निघाला तर वाटेत 1000 पोलीस चौक्या त्याला अडवतील, इसराइल आर्मी, मोसाद हेच नाही तर त्याचे स्वतःचे हमास आणि हुज्बुल्ला पण त्याला तिकडे जाऊ देणार नाहीत. आज २००० वर्ष्यानंतरही त्याला सीमा ओलांडायला ३० वर्ष लागतीलच.

    येशू ख्रिस्ताने जेरुसलेम मध्ये जाऊन मंदिराच्या राजकारणावर, यहुदी (ज्यू ) धर्मावर आणि तत्कालीन राजव्यवस्थेवर वेस्टर्न भिंतीजवळ उभे राहून टीका केली. त्याचा परिणाम म्हणून त्यांना सुळावर चढवले गेले. समजा आज तो मुलगा सीमा ओलांडून वेस्टर्न भिंतीजवळ उभा राहून, धर्म, आताची इसराइली राजवट आणि मंदिराचे राजकारण ह्यावर टीका करू लागला तर?

    आज सुळावर चढवायची प्रथा नाही, पण आजचा जेरुसलेम तितकाच धगधगत आहे. वेस्टर्न भिंतीजवळ टीका करणाऱ्या, नवा धर्म शिकवणाऱ्या ह्या पलेस्तिनिअन तरुणाला आजही मारले जाईल, तेव्हा रोमन आणि यहुदी लोकांनी येशूच्या भविष्याचा निर्णय घेतला होता, आज टीका सुरु होताच तीन गोळ्या त्या तरुणावर झाडल्या जातील – मंदिराच्या पूर्वेकडून मुस्लीम, पश्चिमेकडून यहुदी आणि दक्षिणेकडून ख्रिस्ती परंपरावादी त्याला गोळ्या घालतील. उत्तरेकडून मग इसराइली पोलीस त्याचे प्रेत उचलून घेऊन जातील.

    आज २००० हजार वर्ष्यानंतरही परिस्थिती तशीच आहे, जेरुसलेम मध्येच नाही तर जगभर सगळ्याच धर्मात हा अतिरेकीपणा मुरत चालला आहे.

    समजा मोहमद आजच्या सौदी अरेबियामध्ये देवाचा नवीन संदेश घेऊन आला तर? किंवा आजच्या अयोध्येच्या राम मंदिरात राम जल्माला तर? पात्र आणि घटना थोड्याश्या बदलतील पण परिणाम तोच राहील

     
  • nayanraut 11:39 pm on October 27, 2010 परमालिंक | उत्तर
    Tags: कंपनी, कर्मचारी, कामगार, नफा, पगार, बक्षिसे, बडती, बालमजुरी, बेरोजगारी, मजूर, महागाई, मालक, रात्रशाळा, लॉटरी   

    नोकरी 

    गेले २ दिवस पॅरीसमध्ये अडकून पडलो होतो, आज कसाबसा घरी पोहचलो आणि सुटकेचा श्वास घेतला. पॅरीसमध्ये मोठा संप चालू आहे आणि सगळी व्यवस्था मोडून पडली आहे. दगडफेक, लाठीमार आणि अस्तव्यस्त शहर तिकडच्या पर्यटक आणि कामासाठी गेलेल्या लोकांना जरी नकोस वाटत असल तरी त्यांचे म्हणणे ऐकून घेणे खूप जरुरी आहे. जगातले ९८% लोक हे कामगार किंवा मजूर आहेत, आज युरोपातही कर्मचार्यांच्या मागण्या आणि अधिकारांचा विचार केला जात नाहीय, जर युरोपात हि स्थिती तर भारत आणि चीन सारख्या विकसनशील देशांबाबाद काय बोलणार. आजच्या औद्योगिक जगात कर्मचारी, मालक, अधिकारी आणि एकंदरीत कंपनी ह्या नात्यांना एक वेगळ वळण लागत आहे, हि नाती कधीच चांगली न्हवती आणि जर असाच चालत राहील तर कधीही सुधारणार नाहीत. प्रत्येक जण दुसऱ्याच्या पायावर पाय देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करणारच.

    आजच्या सामाजिक आणि व्यावसाईक जीवनाबद्दल माझी काही निरीक्षणे –

    जर तुम्ही कामगार असाल तर खालील गोष्टी नक्कीच लक्ष्यात ठेवा. –
    १. तुम्ही कोणाची कितीही टिंब टिंब चाटली तरीही जर तुम्ही तुमचे काम केल नाही तर तुम्हाला त्याचा मेहनताना मिळणार नाही. काम करा दाम घ्या.. सोपा हिशोब.
    २. तुमचा मालक किंवा वरिष्ठ अधिकारी तुमचा मित्र नसतो. कितीतरी मालक तुमच्याशी चांगल वागतात, मित्रासारखा व्यवहार करतात पण ते खरे मित्र नसतात. वेळ येते तेव्हा त्यांच्यातला मालक तुम्हाला दिसून येतोच.
    ३. कितीही H .R. आणि कुठलीही चांगली कर्मचारी स्कीम असणारी कंपनी असो, तुमच्या भावनांना तुमच्या कंपनीसाठी काहीही किंमत नसते. जोपर्यंत तुम्ही कंपनीसाठी नफा कमावता तोपर्यंत कंपनी तुमच्याशी प्रामाणिक राहणार. जेव्हा तुमच्यापेक्ष्या जास्त नफा कमावणारा मिळेल तेव्हा तुमाला डावलल जाणारच. कंपनी तुमच्या भावनापेक्ष्या नफ्याला जास्त महत्व देते.
    ४. तुम्ही कितीही प्रामाणिक असाल पण काही वर्ष काम केल्यावर तुमाला तुमच्या कामाचा कंटाळा हा येणारच, जरी प्रामाणिकपणे तुम्ही म्हणत असाल कि “I Love My Job” तरीही मनात तुम्हाला माहित असते कि तुम्हाला ह्याचा कंटाळा आला आहे.
    ५. तुम्ही तुमच्या कंपनीत कितीही महत्वाचे व्यक्ती असाल आणि तुम्हाला वाटत असेल कि माझ्याशिवाय इकडचे पानही हलणार नाही तर तो तुमचा भ्रम आहे. जगात कोणीच इतका महत्वाचा नसतो, तुमची जागा भरण्यास बरेच जण तैयार असणार. कदाचित २-३ महिने त्यांना त्रास होईल पण ते तुमचे काम स्वतःच जरूर शिकतील.
    ६. तुम्ही कितीही मेहनत करा, हात पाय मारा पण शेवटी तुम्हाला नशिबाची साथही हवीच. तुमचे कितीही शिक्षण असेल, कितीही मेहनत असेल तरी शेवटी त्या क्षणी हाजीर तो वजीर.

    मालकांसाठीहि हेच परिमाण लागू होतात.
    तुमचे कर्मचारी हे तुमचे मित्र नाहीत. तुम्ही तुमच्या कर्मचार्याच्या कितीही जवळ असाल, अगदी कौटुंबिक जवळीक असेल तरीही तुम्ही व्यावसाईक पातळीवर स्वतःचा फायदा प्रथम पाहणार.

    म्हणून काही गोष्टी कंपनी, मालक आणि आपण सर्वांनी समजून घ्यायला हव्यात –

    १. तुमची कंपनी किंवा तुमचा प्रोजेक्ट जर फायद्यात नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक उत्पन्नावर होणारच. तुमच्या प्रत्तेक कामाचा आणि प्रत्येक क्रियेचा कंपनीच्या फायद्यासाठी काय उपयोग होईल हे पाहणे प्रत्तेक कार्माच्यार्याची वैयक्तिक जबाबदारी असायला हवी.
    २. मालकांना आणि अधिकार्यांना हे समजायला हव कि कुठलाही कर्मचारी कामाच्या मोबदल्याबाबाद कधीच समाधानी नसतो, प्रत्तेकाल असाच वाटत असत कि त्याला मिळतो त्यापेक्ष्या त्याचा हिस्सा जास्त आहे.
    ३. प्रत्तेक कर्मचारी आणि अधिकार्यांना हे समजायला हव कि कितीही वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रश्न असेल तरीही कामाच्या वेळी काम संपायलाच हव, कुठल्याही वैयक्तिक गोष्टीमुळे काम अडता कामा नये.
    ४. एकमेकांना जर प्रत्तेक कर्मचारी, अधिकारी आणि मालक एका सारख्या आदराने पाहत असतील तर कामाचा एक चांगला मूड निर्माण होईल.
    पण त्याबरोबरच आपले अधिकारही विसरता कामा नये.
    १. सुरक्ष्यीत आणि आरोग्यदायक कामाचा माहोल हा प्रत्तेकाचा हक्क आहे, त्याबाबाद कुठलीही तडजोड होता कामा नये.
    २. एकदा घरी पोहचल्यावर तो वेळ तुमच्या कुटुंबाचा आहे आणि अधिकारी आणि मालक ह्यांनी हे लक्ष्यात घ्यायला हव कि कामाच्या वेळेनंतर काम करणारा कर्मचारी कधीही नाखूष असतो, आणि जर तो नाखूष नसेल तर त्याला त्याबाबत एक अहंकार नक्कीच निर्माण होतो आणि एकंदरीत त्याच वागण कंपनीच्या भल्याचे नसेल.
    ३. बडती, पगार आणि बक्षिसे हि पारदर्शक असावीत, बऱ्याच वेळा बडती आणि पगार हे एकदुसर्या कार्माचार्यामध्ये आकस निर्माण करणारे मुलभूत परिमाण असतात, अधिकारी कितीही लपून बडती आणि पगारवाढ देत असतील पण ह्या गोष्टी लपून राहत नाहीत आणि त्याचा उलट परिणाम कंपनीच्या वातावरणावरच होतो.

    कामगार आणि मालक ह्या संबंधावर आजचा समाज आधारित आहे आणि सरकारचा योग्य हस्तक्षेप ह्यात जरुरी आहे. आपण इथे भारताविषयी बोलूया, कुठल्याही विकसनशील देशात जर लोकांना नोकरी मिळत नसेल तर त्याला बिहार मधून येणारे भैये कारणीभूत नाहीत, नोकर्यांच्या अभावास सगळ्यात जास्त जबाबदार आहे बाल मजुरी. युनायटेड नेशन आणि ILO (Source:http://www.ilo.org/global/lang–en/index.htm) ह्यांच्या आकडेवारीनुसार भारतात 2 करोड मुले हि बालमजूर आहेत. ज्या देशात बेरोजगारी हा एक राजकीय मुद्धा आहे तेथील २% लोकसंख्या काम करण्याच्या वयाची नाही म्हणजे लोक आणि सरकार आपल काम बरोबर करीत नाहीत. आज आपल्या देशात रात्र शाळेत जाणाऱ्या मुलांच्या गोष्टी अभिमानाने सांगितल्या जातात, मुळात शाळेत जाणाऱ्या वयाच्या मुलांसाठी रात्र शाळा असणे हा आपल्या समाजाचा पराभव आहे. मुले रात्री शाळेत जातात म्हणजे ती दिवसा अवैध्य काम करतात हि सत्य परिस्थिती आहे.
    बक्षिश आणि पगारवाढ ह्या गोष्टीवर सरकारचे नियंत्रण असायला हवे, समाज्याच्या सगळ्या स्थरावर समान प्रगती होणे हि सरकारची जबाबदारी आहे. ५० वर्ष्यापुर्वी C.E.O. आणि सामान्य कर्मचारी ह्यातील पगारात २०% चा फरक होता, आज तो २०००% आहे. वाढत्या औधोगीकरणाने समाजात मोठ्या आर्थिक दऱ्या निर्माण केल्या आहेत आणि त्या सोडवणे सरकारची जबाबदारी आहे.

    किमान पगार हा भारतात जरी एक कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही, पगारात जसा अधिकारी आणि कर्मचारी हा फरक महत्वाचा आहे तसाच कर्मचारी आणि मजूर हा सामाजिक घटक तितकाच महत्वाचा आहे. आज भारतात महागाईचा दर वाढत आहे त्यास आर्थिक दरी हा एक महत्वाचा घटक कारणीभूत आहे. म्हणूनच किमान आणि कमाल पगार ह्यावर सरकारच नियंत्रण असण खूपच गरजेच आहे.
    आज सबंध युरोप आणि अमेरिकेत नोकरीवरून रातोरात काढून टाकण्याचा एक झोकाच आला आहे, भारत आणि चीनसारख्या विकसनशील देशांतही हा वारा वाहू लागला आहे. बेरोजगारी देशाची आर्थिक बाजू कमजोर करते आणि त्याचा परिणाम एकंदरीत प्रगतीत होतो. कुठल्याही कर्मचार्यास नोकरीवरून का काढले जात आहे ह्यात सरकारने हस्तक्षेप करणे खूप गरजेचे आहे. नोकरीवरून काढून टाकण्याची प्रक्रिया पारदर्शक असणे खूप महत्वाचे आहे.

    थोडक्यात काय तर आपल जीवन हे आपल्या नोकरीवर अवलंबून आहे, इतर ९८% लोकांप्रमाणे आपण नोकरी करत राहणार, कुठला व्यवसाय करावा हे कितीही मनात असल तरी तुमच आयुष्य नोकरी करण्यातच जाणार, तुमच्या आयुष्यात कितीही लॉटरीची तिकिटे काढली तरी तुम्हाला ती लागणार नाही. तेव्हा आपले काम हेच आपले ध्येय मानून जर कामावर गेलात आणि सरकारने आपली जबाबदारी नीट पार पाडली तर का कर्मचारी आणि मालक संघर्ष सुटेल आणि एक आदर्श समाज निर्माण होईल.

     
  • nayanraut 12:34 am on September 26, 2010 परमालिंक | उत्तर
    Tags: कलमाडी, धन्य तो कलमाडी, पाश्चिमात्य मिडिया, राष्ट्रकुल, सी.एन.एन.   

    धन्य तो कलमाडी 

    शनिवारी सकाळी उठण म्हणजे आमच्या विदेशी मैत्रिणीच्या जीवावर जाते, आणि माझ्याही. पण सकाळी थोडी भूक लागतेच आणि मग नाईलाजाने मीच उठून काहीतरी खायला आणायला खाली गेलो. २० डिग्रीच्या न्यूयोर्कच्या छान वातावरणात मी कॉफी आणि पेस्ट्री घेऊन घरी आलो तर हिने सकाळी सकाळी टी.वी. चालू केला होता, आणि समोर सी.एन.एन. चालू होत. Honey Are You OK?. पोरीने ह्या अगोदर कधी बातम्या बघितल्याचे मला आठवत न्हवते. Baby they are showing something about mess up in India. अरे बापरे, आधीच हिला भारताविषयी चांगल चांगल सांगून बर मत केल होत (नाहीतर यायची नाही ना) पण आता कोणी माझी वाट लावली हे बघायला मीही त्या बातमीत गुंतलो.

    बातमी होती राष्ट्रकुल स्पर्धांच्या तयारीची, सी.एन.एन. अमेरिकन जनतेला भारतातील स्पर्धा आयोजन कसे फसले आहे हे सांगत होत, पण त्यात नक्की काय काय उणीवा आहेत हे सांगण्यात जास्त वेळ दिला जात न्हवता. १ तासाच्या त्या सेगमेंट मध्ये सी.एन.एन. अमेरिकन जनतेला राष्ट्रकुल म्हणजे नेमक काय आणि ह्या स्पर्धा कधी आणि कश्यासाठी होतात हे सांगण्यातच वेळ घालवत होता कारण कार्यक्रमात फोन करणाऱ्या बऱ्याच लोकांना राष्ट्रकुल म्हणजे काय हेच माहित न्हवते, (माझ्या बाजूला अजूनही अंथरुणात असलेल्या बयेलाही) आणि बातम्या देणाऱ्यांना पुन्हा पुन्हा राष्ट्रकुल म्हणजे काय हेच सांगण्यात वेळ घालवावा लागत होता.

    पाश्चिमात्य मिडिया, किंवा देशांना ह्या संघटनेबद्दल खूपच कमी माहिती आहे, जर कलमाडींच्या सेनेने ह्या स्पर्धांची वाट लावली नसती तर मला वाटत कि सी.एन.एन. ने त्याबद्दल बातमीही दिली नसती. आणि अमेरिकन किंवा युरोपिअन लोकच काय, आपल्यातीलही किती जणांना ह्या अगोदर राष्ट्रकुल स्पर्धांविषयी माहिती होती. धन्य तो कलमाडी त्याच्यामुळे आता माझ्या मैत्रिणीलाही कळल कि राष्ट्रकुल म्हणजे काय आणि ह्या स्पर्धा का होतात आणि ह्यात कोण कोण भाग घेते ते. बरेच जण म्हणतील कि त्यांना माहित होते ह्या स्पर्धांविषयी. तुमच्यासाठी एक प्रश्न जो तुम्ही स्वतःलाच विचारा – “ह्या अगोदर ह्या स्पर्धा कुठल्या देशात झाल्या होत्या?”. मी काय म्हणतोय ते तुमच्या उत्तरात तुम्हाला कळेल, कारण तुम्हालाही ह्या स्पर्धांविषयी अमेरिकन जनतेपेक्ष्या जास्त माहिती नाही. मला वाटते तुम्हीही कलमाडी एक धन्यवाद पत्र लिहाच.

    राष्ट्रकुल हि भूतपूर्व ब्रिटीश राज्याची एक संघटना आहे, ब्रिटीशांचे राज्य संपून आता ६० वर्ष ओलांडली, मला वाटत कि हि राष्ट्रकुलची थेरे आता बंध करायला हवीत. कलमाडींने उडवलेला गोंधळ हाच मोका आहे, बंध करा राष्ट्रकुल आणि त्या स्पर्धा.

     
  • nayanraut 8:59 pm on September 18, 2010 परमालिंक | उत्तर
    Tags: आर्थिक, उद्योगपती, एन.जी.ओ., कर, दवाखाने, दान, दानधर्म, धार्मिक संस्था, पुण्य, भिक, मदत, , शाळा, सरकार   

    दानधर्म – एक असामाजिक विष 

    अखेरीस भारताने दिलेला मदतीचा चेक पाकिस्तानने स्वीकारलाच. आर्थिक मदत कोणाला नको असते, आणि ती दानाच्या रुपात आली तर सोनेपे सुहागा कारण दान परत करायचे नसते ना. भारतीय राज्यकारात्यांनाहि दान केल्याचा आणि मदत केल्याचा मनोमन आनंद झाला. आपल्या सगळ्यांनाच होतो. दान केल्यावर आपण सामाज्यासाठी काहीतरी मदत करतोय यात आपण आपणहून खुश होतो. आपल दान आता एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणासाठी, किंवा जेवणासाठी, किंवा कोणाला काही व्यवसाय जमवण्यासाठी कमी लागणार आणि आपल्याला पुण्य मिळणार. आपण दिलेली भिक त्या सिग्नलवरच्या भिकाऱ्याला जेवण देणार त्याचे पुण्य आपल्याला मिळणार.

    भिक, दानधर्म, आर्थिक मदत हे सगळे एकाच आर्थिक असमानतेचे प्रतिक आहेत ह्याचा विचार आपण कधीच त्यावेळी करत नाही कारण दान देताना आपले केविलवाणे मन त्या माणसाच्या किंवा संस्थेच्या मदतीत अडकले असते. आपले हे हळवे मन हि एक चांगली गोष्ट आहे पण त्यापाई आपण आर्थिक असमानतेचा मुद्दा बाजूला करतो असे नाही वाटत का?

    खरे तर आपले हळवे मन ज्यावेळी आपण पैसे देतो किंवा चेक फाडतो त्यापुरते त्या समश्येशी जोडून असते. आपण पैसे दिल्यावर त्या भिकार्याचे उद्या काय झाले असेल ह्याचा आपण कधीच विचार करीत नाहीत. उद्या काय पुढच्या १० मिनिटात त्या भिकार्याने काय केले ह्याच्याशी आपले काहीच देणेघेणे नसते.

    दान धर्म स्वीकारणाऱ्या एन.जी.ओ. ची पण तीच गत. आपण एन.जी.ओ. ला चेक देतो पण तो पैसा कुठे आणि कसा खर्च झाला ह्याचा कुणीच विचार करत नाहीत. गणपतीला वर्गणी मागायला येणाऱ्या मुलांसारखे ह्याची खातीही बरीच बिनहिशोबी किंवा दप्तरी खर्च जास्त दाखवणारी असतात. एन.जी.ओ. च्या जाहिराती, त्याची पत्रे, कर्मचाऱ्यांचे पगार इत्यादी इत्यादी मध्ये बराच पैसा ह्या दप्तरी खात्यातच जातो. आयकर खात्याचा अहवाल वाचला तर समजून येईल कि तुम्ही दिलेल्या पैस्याच्या ६५ % पैसे हे दप्तरी खर्चात जातात आणि फक्त ३५ % खऱ्या कारणासाठी वापरले जातात. गणपती इत्यादी वर्गणीत हा आकडा ८५% – १५% इतका खाली येतो.

    एन.जी.ओ. – बरेच एन.जी.ओ. त्याची मदत देताना काही अटी घालतात, त्यांचे बरेच पैसे उद्योगपती, राज्यकर्ते आणि धार्मिक संस्थांकडून आलेले असतात. उदारणार्थ क्याथालिक चर्च जेव्हा आफ्रिकेतील एखाद्या देशात दवाखाना काढते तेव्हा काही अटी घातल्या जातात, जसे – अबोर्शन करता येणार नाही, कोंडमचा वापर करू नये, एकच पत्नी असावी आणि येशूची प्रार्थना करावी. उद्योगपती त्या दवाखान्यात त्यांच्या कंपनीचे समान वापरण्याचीच अट घालतात. ते मोठे दानकर्ते असतात आणि त्याच्या अटी मान्य होतात आणि आपण छोटे दानकर्ते त्या चेकबरोबरच ती रक्कम विसरून जातो.

    सरकार – ज्याक्षणी आपण दान करतो त्याच क्षणी सरकारवरच त्या समस्येला निस्तरायच दडपण कमी होते. आपण दिलेल्या दानामुळे सरकार अकार्यक्षम होत जाते ह्याची जाणीव कुणालाही होत नाही.

    व्यवहार – खरे तर दान हा एक व्यवहारच आहे. दानामध्ये एकाच्या तोंडाचा घास दुसर्याच्या तोंडात भरवला जातो. श्रीमंत देश गरीब देशाला दिलेल्या दानामध्ये राजकीय आणि आर्थिक लाभ, स्वस्त बाजार आणि स्वस्त कामगार पाहत असतात.

    गरिबी – अर्थशास्राचा अभ्यास आपणास दाखून देतो कि दानधर्म हा गरिबीच्या आर्थिक चक्राला अधिक गती देतो. दानधर्म कधीच गरिबी घालवत नाही तर त्याला पूरकच ठरतो. आजची सत्य परिस्थिती हीच आहे कि करोडो डॉलर हाती असूनही आफ्रिकेत कित्तेक मुले कुपोषणाने मरत आहेत आणि एन.जी.ओ. कितीही पैसे असून काहीच करू शकत नाही. गरिबी हि आपल्या आर्थिक साच्याचा एक घटक आहे आणि जीतपर्यंत श्रीमंती आहे तोपर्यंत गरीब असणारच. विषम आर्थिक समाज हे ह्यामागचे मूळ कारण आहे आणि दानधर्म हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही.

    अपराध – आफ्रिकेत बरीच उदाहरणे दिसून येतील कि एन.जी.ओ. मदत वाटण्याकरिता गुंड, अपराधी आणि माफियांची मदत घेत असतात. त्यांच्यापुढे ह्या माफियान्शिवाय सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहचण्याचा मार्ग नसतो. येणारी मदत लोकांपर्यंत पोहचवणारे दलाल हे माफियाच असतात आणि त्यांना जल्म देणारी खरी आई तो दानधर्म नाही का?

    एक असामाजिक विष असणार दानधर्माचे हे क्रूर रूप जर आपण समजू शकलो तर त्यावर उपाय शोधायलाच हवा, काही उपाय जे मला योग्य वाटतात

    उपाय –

    १. कर – एन.जी.ओ., उद्योगपती, राजकीय नेते आणि धार्मिक संस्था हे दानधर्माचे खरे लोणी खातात आणि ते दानधर्म करतात कारण त्यांना करात सूट मिळते. दान धर्मावरील करात जर सूट रद्द केली तर बरेच मोठे दानकर्ते ह्यापासून परार्रुत्त होतील.

    २. सामाजिक संस्था – एन.जी.ओ. आणि धार्मिक संस्था ह्यांना सामाजिक संस्था (उदारणार्थ – दवाखाने, शाळा इत्यादी) चालवण्याची परवानगी नसावी. जर त्यांना ह्या कामासाठी पैसे द्यायचे असतील तर ते सरकारी संस्थांनाच (सरकारचे आरोग्य आणि शिक्षण खाते) ह्यांना द्यावे. त्यामुळे ह्या संस्थानाच्या अटी त्या पैश्याबरोबर येणार नाहीत.

    ३. दप्तरी खर्च – एन.जी.ओ.ने जमा केलेल्या रकमेचा १००% रक्कम हि दानाच्या सामाश्येसाठी वापरली जावी, कुठलाही दप्तरी खर्च हा त्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचार्याचा वैयक्तिक खर्च असावा. एन.जी.ओ.त काम करणारे त्या कामाच्या आनंदासाठी आलले असावे, पगार घेण्यासाठी नाही.

    ह्या सगळ्यात सरकारची भूमिका खूप महत्वाची आहे आणि ती त्याने निभावावी हे मी गृहीत धरले आहे. प्रत्येक नागरिकाने सरकला सामाजिक संस्थांबद्दल जाब विचाराने गरजेचे आहे.

    मला अश्या जगात राहायला आवडेल जेथे दानधर्म, भिक काहीच नसेल. दान नसेल कारण आपण देऊ नये म्हणून नाही तर कोणाला गरज नाही म्हणून. किती चं जर असेल ते. कुठलीही नैसर्गिक आपदा आली तरी सरकार आणि नागरिक त्या अप्पातीतून कुठल्याही बाहेरील मदतीशिवाय सावरू शकतील आणि मग आपला समाज एक आदर्श समाज बनेल.

    तुमच्या प्रतिक्रिया आणि उपायही वाचायला आवडतील – नयन

     
  • nayanraut 5:09 pm on September 10, 2010 परमालिंक | उत्तर
    Tags: अहंकार, काळजी, गर्व, ग्लोबल वार्मिंग, जग, निसर्ग, प्राणी, प्राणी वाचवा, प्लास्टिक, विनोदी, संकट   

    काम झाल? निघा आता. 

    इदिच्या सुट्टीनिमित्ताने आज जरा उशीराच उठालो, हवेत खुप गरवा होता, रात्रभर पडत असलेल्या पावसाचा हा परिणाम होता. काल संध्याकाळीच उदया दुपारी स्विमिंग पुलवर जायचा बेत अखला होता. मैत्रिणीने नविन बिकिनी घेतली होती अणि म्हणूनच तिने हा प्लान केला होता. दुपारपर्यंत काही पाउस कमी होत न्हवता आणि हिने आपला राग पावसावर आणि ग्लोबल वार्मिन्ग्वर काढायला सुरवात केली. सप्टेबर महिन्यात इकडे पाउस पडत नाही. पावसाळा ३ महिने लवकर आला होता. जागतिक उष्म्याच्या ह्या परिणामाचा उष्मा घरात जाणवत होता, आपण हि पृथ्वी नष्ट करत आहोत आणि काहीतरी केलेच पाहिजे हा तिचा सूर होता. मी विचार केला, खरच? आपण जग नष्ट करत आहोत?

    आजकाल लोकांना नवीन फॅड लागलाय, काळजी, सगळेच जण आता काळजी करत आहेत, कसली काळजी, तर सगळ्याच गोष्टीची काळजी. हवा, पाणी, जमीन, केमिकल, अन्न सगळ्या गोष्टींची काळजी, आता नवीन फॅड आहे प्राणी वाचवा, आणि वाघ वाचवा आणि संकटग्रस्थ जीव वाचवा. संकटग्रस्थ प्राण्यांबद्दल काही सांगतो – संकटग्रस्थ प्राणी वाचवणे हा माणसाचा गर्विष्ठ प्रयत्न आहे. निसर्गावर मात करण्याचा, निसर्गावर बंधन घालायचा हा गर्विष्ठ प्रयत्न आहे.

    निसर्गावर नियमन घालायच्या ह्या प्रयत्नानेच आपण ह्या परिस्थितीत आलो आहोत. 30 करोड वर्ष्याच्या पृथ्वीच्या इतिहासात आजपर्यंत जितके प्राणी आणि वनस्पती निर्माण झाल्या त्यातल्या ९०% नष्ट झाल्या आहेत. आणि माणसाचा ह्यात काहीही हात न्हवता. ते सगळे सजीव नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणांनी नष्ट झाले. हाच निसर्गाचा नियम आहे, जीवन आणि अंत. दररोज निरनिराळ्या जातीचे २५ सजीव नष्ट होत आहेत. मानवी जीवनाच्या किंवा वागण्याच्या कुठल्याही फरकाचा ह्या निसर्गनियमावर परिणाम होत नसतो. आज असणारे २५ सजीव उद्या नसणार तेव्हा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यापेक्ष्या सुखाने जाऊ द्या.

    माणूस हा आजकाल स्वतःला जरा जास्तच शहाणा समजू लागला आहे, निसर्गावर आपण मात करू अशी भावना त्याच्या मनात रुजू लागली आहे. प्रत्येकाला आज काही न काही तरी वाचवायचे आहे. झाड वाचवा आणि प्राणी वाचवा, मासे वाचवा आणि समुद्र वाचवा, आणि सगळ्यात गर्विष्ठ आणि अतिशहाणपणाचा मुद्दा म्हणजे पृथ्वी वाचवा आणि तिची काळजी घ्या. काय? ह्यांचं काय डोक बिक फिरलंय का? पृथ्वीची काळजी घ्या? अरे इकडे आपण एक दुसऱ्याची काळजी घेऊ शकत नाहीत, इतकेच काय तर स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. आणि आता सगळ्या पृथ्वीची काळजी घ्यायची? बस करा रे बाबानो.

    खर बघायचं तर पृथ्वीमध्ये काहीच बिनसलं नाही, ती असावी तशीच आहे. तीच कोणीच काही वाकड करू शकत नाही. मुद्दा हा आहे कि माणसांची वाट लागली आहे. आपण हि पृथ्वी स्वतःला राहण्यालायक ठेवली नाही. पृथ्वी ४० करोड वर्ष्याची आहे आणि माणूस? २० लाख वर्ष, आणि उद्योजक समाज मागची २०० वर्ष. सोप्पं गणित आहे हे, ४० करोड विरुद्ध २००. आणि आता आपण असा मानायचं कि आपण ह्या पृथ्वीचा नाश करतोय?

    पृथ्वी हि माणसापेक्ष्या अतिक्रूर नैसर्गिक आपदांना सामोरी गेली आहे. भूगर्भशास्त्राचा अभ्यास आपल्याला दाखून देतो कि पृथ्वी अनेक आपदांना उदा. भूकंप, सुपर ज्वालामुखी, भूगर्भीय खंडांची हालचाल, सूर्याची उष्मा वादळे, लाखो वर्षाची उल्कावर्षाव, पूर, महापूर आणि प्रलय, चुंबकीय परिणाम आणि हजारो वर्षांनी परत येणारी थंड आईस अजेस आणि आपण काय विचार करतोय कि काही प्लास्टिकच्या पिशव्या आणि कोकोकोलाच्या बाटल्या आणि तुमच्या टाटानेनो मधून निघणारा धूर?

    नीट विचार करा, पृथ्वीच काहीच बिनसलं नाहीय, आपलंच बिनसलय. माणसाने आपला बोरिया बिस्तर बांधायची वेळ स्वतःवर आणली आहे. आणि फक्त २० ते ३० हजार वर्षात ह्या पृथ्वीतलावर माणूस राहिला होता ह्याची काहीच निशाणी उरणार नाही. रोज नष्ट होणार्या त्या २५ सजीवांमध्ये एक दिवस आपला नंबर लागणारच आहे. आपल्या नाशानंतर पृथ्वी पुन्हा जीवनाची सुरवात करेल, आपली सगळी निशाणी हळूहळू पुसली जाईल. प्लास्टिक कदाचित नष्ट होणार नाही, मग पृथ्वी त्याला आपल्यात सामाऊन घेईल. प्लास्टिक हे पृथ्वीतूनच आले आहे, जसा आपल्याला प्लास्टिकचा राग आहे तसा तिला राग नाही. आपल्यानंतर मग पृथ्वी हि प्लास्टिकसहित असणारा एक ग्रह बनेल. कदाचित पृथ्वीने माणूस ह्यासाठीच बनवला असेल, तिला प्लास्टिक हव होत, तिला माहित न्हवत कि कस बनवायचं, मग तिने आपल्याला बनविल. सगळ्या धार्मिक पुस्तकांचा गाभा असणारा, जगातील सगळ्यात जुना प्रश्न “मानवी जीवनाचा उद्देश काय?” ह्या प्रश्नाचे कदाचित खरे उत्तर मग प्लास्टीकच असेल.

    तर मग आता पुरेस प्लास्टिक बनून झाल आहे, पुरेसा कार्बन हवेत मिसळला आहे, हवा गरम झाली आहे. कदाचित हेच आपले काम होत, आपण ते केला आणि आपल काम संपल आहे. आता आपली जायची वेळ आली आहे. चला सुखाने जाऊया.काम झाल निघा आता.

    संधर्भ: कार्लींचा एच.बी.ओ. स्पेशल.

     
    • झम्प्या झपाटलेला 12:37 pm on सप्टेंबर 14, 2010 परमालिंक | उत्तर

      <<<जसा आपल्याला प्लास्टिकचा राग आहे तसा तिला राग नाही. आपल्यानंतर मग पृथ्वी हि प्लास्टिकसहित असणारा एक ग्रह बनेल. कदाचित पृथ्वीने माणूस ह्यासाठीच बनवला असेल, तिला प्लास्टिक हव होत, तिला माहित न्हवत कि कस बनवायचं, मग तिने आपल्याला बनविल. सगळ्या धार्मिक पुस्तकांचा गाभा असणारा, जगातील सगळ्यात जुना प्रश्न “मानवी जीवनाचा उद्देश काय?” ह्या प्रश्नाचे कदाचित खरे उत्तर मग प्लास्टीकच असेल.<<<<

      हा हा हा…अरे बापरे प्लास्टिक इतके महत्वाचे आहे…ते जीवनाचा उद्देश वगैरे आहे…आणि आम्ही मर्त्य कसल्या नको त्या विषयांच्या मागे लागलो आहोत…

      तो आजसे बोलो…
      जोरशोरसे बोलो…
      प्लास्टिक जिंदाबाद….प्लास्टिक अमर रहे….

      • Vidyadhar 2:27 pm on सप्टेंबर 14, 2010 परमालिंक | उत्तर

        आणि एक सांगायचं राहिलं…
        तुमचा ब्लॉग मी बरेचदा वाचतो.. तुम्ही आपले अनुभव छान शब्दबद्ध करता!

        • nayanraut 10:27 pm on सप्टेंबर 14, 2010 परमालिंक

          तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

      • nayanraut 10:27 pm on सप्टेंबर 14, 2010 परमालिंक | उत्तर

        हा हा हा!!! मी फक्त गम्मत केली रे.

    • Vidyadhar 2:27 pm on सप्टेंबर 14, 2010 परमालिंक | उत्तर

      भाई,
      सर्वांत महत्वाचं… पृथ्वी वाचवा ह्याचा अर्थ, आपल्यासाठी वाचवा असा आहे…
      बाकी.. हे निहिलिस्ट विचार आहेत.. ह्यातल्या प्रत्येक युक्तिवादाला प्रत्युत्तर असू शकतं..
      पण असू दे.. निहिलिझम सर्क्युलर रेफरन्सेसमध्येच राहतो..

    • झम्प्या झपाटलेला 3:04 सकाळी on सप्टेंबर 15, 2010 परमालिंक | उत्तर

      नयन गमतीगमतीत शालजोडीतला ठेऊन दिलायेस तू…आपल्याला तर ही विद्याधर बोलतोय तशी निहिलीस्त् विचारधारा जाम आवडली…

  • nayanraut 7:33 pm on August 29, 2010 परमालिंक | उत्तर
    Tags: अंधश्रद्धा, देव, नास्तिक, प्रेम, श्रद्धा, हनुमान   

    नास्तिक – भाग 1 

    देवावर विश्वास हा प्रत्तेकाचा वैयक्तिक प्रश्न आहे असे सगळे म्हणत असले तरी तो एक सामाजिक प्रश्न आहे हे सत्य सगळेच नाकारत आले आहेत. माझा देवावरच विश्वास कधी उडाला हे मला आठवत हि नाही पण नास्तिक कि धार्मिक हा मानसिक तिढा बऱ्याच लोकांना अजून सोडवता आला नाही.

    लहानपणापासूनच मला देवाविषयी अंधश्रद्धा हाच भाव निर्माण झाला होता, वडिलधार्यांनी नेहमीच मला अंधश्रद्धेपासून सावध करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या ह्या प्रयत्नात एक असत्य लपले होते. त्यांच्यानुसार त्यांचा विश्वास हि श्रद्धा होती आणि ढोंगीपणा हि अंधश्रद्धा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यात नेमका फरक लहानपणी समाजात होता पण जस जसा मी मोठा होत गेलो आणि विचार करू लागलो तेव्हा मला श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यात काहीही फरक नाही हे जणू लागल.

    मी पाच वर्षाचा होतो तेव्हाची गोष्ट, आमच्या अंगणात कुठली तरी एक पूजा घातली होती, मी जवळच खेळत होतो, वडिलांनी मला बोलाविले व सांगितले कि जा देवाला प्रार्थना कर आणि म्हण कि देवा मला चांगली बुद्धी दे. मी क्षणात तेथे गेलो आणि मोठ्याने म्हटले कि देवा मला चांगली बुद्धी नको देऊ. सगळ्यांनी मला प्रेमाने हुशार आहे म्हणून हे हसण्यावारी नेले. मी तिथून परत खेळायला गेलो पण तेथे माझ्या मित्रांनी मात्र मला धारेवर धरल. त्यांच्या म्हणण्यानुसार मी देवाचा अपमान केला होता आणि मला आता शिक्षा मिळणार. मी शाळेत नापास होणार. मुंबईपासून १५० किलो-मीटर अंतरावर असलेल्या एका गावात १९८५ साली मी त्या वर्षी प्रथमच शाळेत गेलो होतो. तेथे पहिली पासूनच शाळा सुरु होते, नापास म्हणजे नेमके काय हे मला माहीतही न्हवते. माझ्या शैषणिक पातळीची कल्पना माझ्या आई-वडिलांना होती कि नाही माहित नाही पण मला स्वतःला न्हवती.

    मी घरी गेलो आणि आईला विचारले “आई, नापास न होण्यासाठी काय करावे लागते?”, उत्तर सोपे होते, मन लाऊन आभ्यास कर. वर्षभर माझे मित्र मला चिडवत कि मी नापासच होणार. आणि परीक्षेचा निर्णय लागला. पहिल्या इयत्तेत माझा पहिला नंबर आला होता. यश मिळवण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करायची गरज नाही तर मन लाऊन अभ्यास करायला हवा हा धडा मला पहिलीतच मिळाला होता.

    पण अजून मी नास्तिक झालो न्हवतो, देवावर माझा विश्वास अजून उडाला न्हवता. दुसरी -तिसरीत असतानाची गोष्ट, शाळेत सरस्वती पूजनाचा कार्यक्रम होता. त्या दिवशी सुट्टी असते पण तरीही पाटीवर सरस्वतीची रांगोळी कडून पूजनाला शाळेत जावे लागायचे. मी मित्रांना म्हटलं, सुट्टी आहे मैच खेळूया. सगळ्यांनी म्हटलं कि नको नको, सरस्वतीची पूजा करायला जावेच लागेल नाहीतर पाप लागेल. मी सगळ्यांना धीर दिला, काहीही होत नाही नाहीका मी पहिलीत पहिला आलो, चला मग. घरी आईला बोललो कि नाही जात मी शाळेत पूजनाला, घरी बसून अभ्यास करतो, परीक्ष्या जवळ आली आहे. आईला तर बरंच वाटल, छान मुलगा अभ्यासाचा विचार करतो. आमच्या वर्गातून खूपच कमी मुल आली होती पूजनाला आणि मग आमच्या बाईनी चौकशी केली कि नक्की का नाही आली मुले, आणि जेव्हा खर कारण कळले तेव्हा माझ्या आईकडे तक्रार गेली. आईने उत्तर दिले, तो तर बिचारा अभ्यास करत होता.देव्पुजेने काही होते कि नाही ह्यावरच माझा विश्वास उडत चालला होता, पण देवपूजा काही थांबली न्हवती, रोज संध्याकाळी शुभम करोति नेमाने चालू होते.

    मी पाचवीत असतानाची गोष्ट, शाळेतील एक मुलगी मला आवडायची, कोवळ्या वयातील ते पहिले कोवळे प्रेम होते.मग काय, आमच्या शाळेजवळच्या देवळात दर शनिवारी मी हार वाहायला लागलो. दर शनिवारची माझी प्रार्थना ठरलेलीच होती – “देवा, सगळ्या जगात सगळ्यांना सुखी ठेव आणि मला ती मुलगी मिळू दे.”. पण त्या वयात त्या मुलीला काही सांगायची माझी हिम्मत झाली नाही आणि सहामाई परीक्षेनंतर ती माझ्या दुसर्याच मित्राची गर्लफ्रेंड झाली होती.

    कोवळ्या वयातला तो पहिला घाव होता पण अजूनही देवावरच विश्वास उडाला न्हवता. मी पुन्हा देवळात गेलो, विचारलं, का देवा का? इतकी चांगली मुलगी आणि माझा तो दुसरा मित्र इतका चांगला नाही. हिरमुसलेला मी, जाऊन माझ्या एका खास मित्राला हि गोष्ट सांगितली. त्याला म्हटले, अरे ह्या प्रार्थनेने काही होत नाही रे, जर काही पाहिजे तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कदाचित ह्या घटनेने मला एक चांगली शिकवण दिली होती. पण प्रर्थानेवरचा विश्वास अजून कायम होता, त्याला कारण होते माझा तो मित्र – त्याने मला विचारारले, मग कुठल्या देवळात प्रार्थना करीत होतास? मी म्हटलं कि समोरच्या हनुमानाच्या देवळात. ” अरे गाढवा, मारुतीच्या देवळात कधी मुलीचे नाव घ्यायचे नसते. त्यामुळेच तुला ती मिळाली नाही. पुढे कुठली मुलगी पसंद आली तर कृष्णाच्या देवळात जा.”

    क्रमश:

     
c
Compose new post
j
Next post/Next comment
k
Previous post/Previous comment
r
उत्तर
e
संपादन
o
Show/Hide comments
t
वर जा
l
Go to login
h
Show/Hide help
shift + esc
रद्द करा